पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट – या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट – या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बँड्समन / मशन शिपाई / कारागृह शिपाई भरती – 2025 करिता उमेदवारांसाठी सूचना […]

पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बँड्समन / मशन शिपाई / कारागृह शिपाई भरती – 2025 करिता उमेदवारांसाठी सूचना


अर्जाचे ऑनलाईन सादरीकरण करण्याची दिनांक व वेळ :

अ.क्र.तपशीलदिनांक व वेळ
01अर्ज सादर करण्यास सुरुवात29 ऑक्टोबर 2025 पासून
02 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक30 नोव्हेंबर 2025 पर्यंत

परीक्षा शुल्क :

अ.क्र.पदाचे नावखुला प्रवर्गमागास प्रवर्ग
1पोलीस शिपाई₹ 450/-₹ 350/-
2पोलीस शिपाई चालक₹ 450/-₹ 350/-
3बँड्समन₹ 450/-₹ 350/-
4कारागृह शिपाई₹ 450/-₹ 350/-

⬛️ पात्रता अटी :

✦ शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

✦ वयोमर्यादा : 

  • सामान्य प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे
  • मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे
  • माजी सैनिक / क्रीडा / महिला व इतर विशेष प्रवर्गांना शासन निर्णयाप्रमाणे सवलत.
  • 2022 ते 2025 या काळात भरती न झाल्यामुळे काही उमेदवारांना अतिरिक्त वयोमर्यादा दिली आहे. (10 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे)

 ⬛️ निवड प्रक्रिया :
1. लेखी परीक्षा – वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका (100 गुण)
2. शारीरिक चाचणी – धावणे – (1600 मीटर),धावणे – (100 मीटर) , लांब उडी इ. (एकूण 50 गुण)
3. कागदपत्र पडताळणी
4. वैद्यकीय तपासणी 

⬛️ वेतनमान :

  • पोलीस शिपाई पदासाठी वेतनमान: रु.21,700 ते रु.69,100/- दरमहा
  • यासोबतच भत्ते, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, आरोग्य सुविधा इत्यादी लाभ मिळतात.

⬛️ महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – अभ्यासक्रम व गुण वितरण:

✦ लेखी परीक्षा (Written Exam) 100 – गुण

एकूण गुण : 100
कालावधी (वेळ) : 90 मिनिटे
प्रश्न प्रकार : वस्तुनिष्ठ (Objective / MCQ)
पात्रता : शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेस पात्रता मिळते

अभ्यासक्रम व गुण वाटप

विभागविषयगुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमहाराष्ट्र व भारताचा इतिहास, भूगोल, संविधान, विज्ञान, पर्यावरण, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय घडामोडी25
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)तर्कशास्त्रीय प्रश्न, श्रेणी, कोडी, साम्य-भिन्नता, गणितीय तर्क25
गणितबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, नफा-तोटा, व्याज, प्रमाण-प्रमाणभाग, वेळ-वेग-अंतर25
मराठी भाषाव्याकरण, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, वाचन समज, वाक्यरचना25
✦ शारीरिक चाचणी (Physical Test) 50 – गुण

लेखी परीक्षेपूर्वी शारीरिक चाचणी (Physical Efficiency Test) घेतली जाते.

उमेदवारक्रीडा प्रकारअंतर/वजनगुण
पुरुषधावणे1600 मीटर20 
गोळाफेक (Shot Put)7.26 किग्रॅ15
धावणे100 मीटर15
महिलाधावणे800 मीटर20
गोळाफेक (Shot Put)4 किग्रॅ15
धावणे100 मीटर15

⬛️  अंतिम गुणांकन (Final Merit) :
👉 शारीरिक चाचणी – 50 गुण
👉 लेखी परीक्षा – 100 गुण
👉 एकूण – 150  गुणांवर आधारित निवड प्रक्रिया


📄 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10 वी व 12 वी मार्कशीट)
  • जन्मतारीख पुरावा (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • फोटो व स्वाक्षरी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रांची विस्तृत माहिती

  • आधारकार्ड
  • पासपोर्ट फोटो (5 ते 10)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • 10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • नॉन क्रीमीलेयर (नवीन काढून घ्यावे)
  • वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
  • EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र)
  • उच्चतम शैक्षणिक अहर्ता गुणपत्रक (असल्यास)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास)
  • जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास)
  • अन्य प्रमाणपत्र (आरक्षणाशी निगडित असल्यास)
  • पोलीस पाळी प्रमाणपत्र (असल्यास)
  • होमगार्ड प्रमाणपत्र (1095 दिवस)
  • नावात बदल असल्यास राजपत्र प्रत (गझेट)
  • खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले)
  • पोलीस भरतीतील महिला उमेदवारांसाठी 30% आरक्षणाचा सवलतीचा प्रमाणपत्र
  • माजी सैनिक उमेदवारासाठी डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रुपइन्शुरन्स व इतर प्रमाणपत्रे

अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज भरण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top